ठरलेल्या वेळेत फ्लॅटचे काम पूर्ण करून न दिल्याने बिल्डर विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

प्रमोद दांगट, निरगुडसर

सन 2016 मध्ये बिल्डरला ५० लाख रुपये देऊन दिलेले चार फ्लॅटचा ताबा व घराचे बांधकाम सात महिन्याच्या आत करून देतो असे करार करूनही वेळेत पूर्ण करून न दिल्याने मंचर येथील बिल्डर विरोधात मंचर पोलीस ठाण्यात मालती ज्ञानदेव कुंडारे ( वय ५० ,रा.वाडेकर वाडी ता.खेड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालती हुंडारे यांनी सन २०१६ मध्ये मंचर येथील स्वामीछत्र अपार्टमेंट मध्ये ४ फ्लॅट घ्यायचे होते त्यांनी या प्रकल्पातील बिल्डर ग्रीन डायमंड बिल्डर्स अँड डेव्हलपर तर्फे बिल्डर शंकर वाघोजी पवार ( रा. मंचर स्वामीछत्र अपार्टमेंट ता. आंबेगाव ) यांना चार फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३५ लाख रुपये व गावातील घराचे बांधकामासाठी १५ लाख रुपये असे एकूण ५० लाख रुपये दिले होते.घराचे बांधकाम फ्लॅटचे बांधकाम व ताबा ७ महिन्याच्या आत बांधून देण्याचे ठरले होते. ते सात महिन्याच्या आत न दिल्यास मूळ रक्कम व नुकसानभरपाई पुन्हा त्याच्या कडून मिळेल या अटीवर ५० लाख रुपये मंचर येथील ऑफिस मध्ये देण्यात आले होते. तसा करारही शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला होता.त्यानंतर बिल्डर शंकर पवार यांनी त्यांच्या घराचे व फ्लॅटचे बांधकाम सुरू केले व काही बांधकाम झाल्या नंतर काम बंद केले. याबाबत मालती हुंडारे यांनी त्यांना वारंवार बांधकाम पूर्ण करून देण्याचा तगादा लावला तरीही त्यांनी बांधकाम पूर्ण केले नाही. गेली चार वर्ष त्यांच्याकडे वारंवार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली जात असूनही बिल्डर त्याकडे दुर्लक्ष करत आहे. घराच्या बांधकामासाठी फ्लॅटच्या बांधकामासाठी पूर्ण रक्कम घेऊनही दिलेल्या वेळेत व त्यापेक्षा जास्त काळ उलटूनही बिल्डर शंकर पवार हे बांधकाम करून देत नसल्याने मालती हुंडारे यांनी त्यांच्या विरोधात फसवणूक केली असल्याची तक्रार मंचर पोलिस ठाण्यात केली आहे.पुढील तपास पी.एस. आय.जाधव मॅडम करत आहे.

Previous articleतळेघर ग्रामीण रूग्णालयासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
Next articleवाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या