वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

 प्रमोद दांगट

शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाबळ फाटा येथे वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या नऊ जणांना शिरूर पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयाची वाघाचे कातडे व १० लाख रुपयांची दोन चार चाकी वाहने जप्त केले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शिरूर पोलीस ठाण्याचे पो. नि.प्रवीण खानापुरे यांना गुप्त बातमी दारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पाबळ फाटा येथे १ कोटी रुपयांची वाघाच्या कातड्याची तस्करी होणार आहे.त्यानंतर त्यांनी लगेच दोन पंचाना बोलावून घेत त्यांना बातमीचा आशय पोलीस स्टेशन येथे समजावून सांगीतला.त्यांनतर पंच व पोलीस स्टाफ सह खासगी वाहनाने खाजगी कपडयामध्ये मिळाले बातमीचे ठिकाणी पाबळ फाटा शिरुर येथे रवाना झाले सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला असता दि 6/02/2021 रोजी 00.05 वा चे सूमारास पाबळफाटा चौकात लाईटचे प्रकाशात एक करडया रंगाची इको कार एम.एच.१४ जे.एच.५७२७ व एक पांढ – या रंगाची एम.एच.१४ जी.यू.५२१६ या रंगाची हयुदाई कंपनीची एक्सेन्ट कार एकापाठोपाठ येवून थांबली.यावेळी या वाहनांची पो.नि.खानापुरे ,पोलीस स्टाफ व पंच यांनी व तपासली केली असता एम.एच.१४ जी.यू.५२१६ या कार चे डिक्की मध्ये चार फूट लांबीचे ३.५ फूट रुंदीचे पिवळसर तपकिरी रंगाचे,त्याच्या वरच्या जबड्याला १३ दात व खालच्या जबड्याला ११ दात असलेले सुमारे १ कोटी रुपयांचे वाघाचे कातडे मिळून आले. पोलिसांनी कातडे व ५,००,०००/ – एक करड्या रंगाची मारुती कंपनीची इको एम.एच.१४ जे.एच.५७२७ ही कार, ५,००,००० / – एक पांढ – या रंगाची हयूदाई कंपनीची एक्सेन्ट कार क्रमांक एम.एच.१४ जी.यू.५२१६ असा एकूण १,१०,००००० / – एकूण किंमत येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी तस्करी साठी आलेले
१ ) मयूर मारुती कोळेकर ( वय २२ रा.किवळे ता.खेड जि पूणे )
२) विनायक सोपान केदारी ( वय ३० वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे )
३) साईराज विजय गाडे वय २० वर्षे रा.खरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे )
४) चिराग कैलास हांडे ( वय २६ वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे )
५) कौस्तुभ महादू नायकडे ( वय -२८ वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे )
६ ) वैभव अर्जून गाडे ( वय -२० रा. राखरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे )
७) शिवाजी किसन कूसळकर वय -३० वर्षे रा.कडा ता.आष्टी जि.बीड
८ ) अमोल बाळू राजगूरु ( वय -३४ रा.वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव जि.पूणे )
९) धनंजय जयराम पाटोळे वय -२२ रा.वडगाव पाटोळे ता.खेड जि.पूणे ) अशी नवे त्यांनी पंचासमक्ष त्यांनी सांगितली असून त्यांच्यावर वन्यजीव सरंक्षण अधिनियम कायद्यानुसार शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे . पुढील तपास पो.नि. प्रविण खाणापुरे करत आहेत

Previous articleठरलेल्या वेळेत फ्लॅटचे काम पूर्ण करून न दिल्याने बिल्डर विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
Next articleउसने पैसे दिले नाही म्हणून मावस बहिणीने बहिणीला फेकून मारली इस्त्री