जुन्नरच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गौरव

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन च्या माध्यमातून योगदान दिले. आणि केवळ आपल्या शाळेचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श पाठ ज्यांनी घेतले त्या शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात तापडीया नाटयमंदीर ,निराला बाजार येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू , मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेशकुमार गोंदवले, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल आदी मान्यवर तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार बच्चू कडू म्हणाले की, कोरोना काळात सर्व बंद असताना फक्त दवाखाने आणि ऑनलाईन शिक्षण सुरू होते पिढी घडविणारा शिक्षक हाच खरा देशाचा रक्षक आहे. ऑनलाइन पाठात सर्वात जास्त लाईक आणि विव्हर्स असलेल्या शिवरायांचे बालपण या ऑनलाईन पाठाच्या वेळी प्रत्यक्ष शिवनेरी वर जाउन पाठ घेणाऱ्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभूती देणाऱ्या जुन्नरच्या संजय रणदिवे सरांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये ती शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी झेड पी लाईव्ह एज्युकेशन आयोजित घरातच सुरु झाली. ऑनलाईन शाळा या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील विविध शिक्षकांनी ऑनलाईन पाठाचे सर्वोत्तम सादरीकरण केले होते.

यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिक्षक संजय रणदिवे, संगीता ढमाले, साईनाथ कनिंगध्वज, प्रशांत ढवळे ,भारती आल्हाट, संतोष डुकरे , प्रशाली डुकरे ,ज्योती तोरणे, भाग्यश्री बेलवटे, धनश्री आतकरी, पुष्पलता डोंगरे, अनिता टिकेकर, उज्वला नांगरे, दिपश्री पटाडे, ललिता वाघ, कीर्ती चव्हाण, उत्तम सदाकाळ,संतोष पन्हाळे, संतोष शिंदे या शिक्षकांचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षिका संगीता ढमाले यांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक अँप चे उदघाटन करण्यात आले.

Previous articleराष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी
Next articleतळेघर ग्रामीण रूग्णालयासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर