राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी

अमोल भोसले,पुणे

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल यांच्या वतीने आपण “वाण आरोग्याचे ” हा महिलांसाठी आरोग्य तपासणी व उपचार हा उपक्रम पुणे शहरातील कॅटेन्मेंट विभाग, मामासाहेब बडदे हॉस्पिटल, नानापेठ येथे दि ५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात आला. या उपक्रमास पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे या उपस्थित होत्या.त्याचबरोबर माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे शहर व्यापारी सेल अध्यक्ष भोलसिंग अरोरा, पुणे शहर महिला कार्याध्यक्ष मृणालिनी वाणी, महिला अध्यक्ष मीना पवार उपस्थित होते.

या उपक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल अध्यक्ष डॉ. सुनील जगताप ,उपाध्यक्ष डॉ संगिता खेनट , डॉ राहुल सूर्यवंशी, सचिव डॉ. हेमंत तुसे, विभाग अध्यक्ष देवेंद्र संचेती ,डॉ.विजयसिंह पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच या उपक्रमात डॉ. पल्लवी जगताप, स्त्रीरोगतज्ज्ञ या उपस्थित होत्या. विशेष करुन १२ महिला डॉक्टर्स डॉ.अनुपमा गायकवाड, डॉ.ज्योती तुसे , डॉ.संगीता माने, डॉ. दीपाली वाघ, डॉ. सारीक परदेशी, डॉ. कल्पना जाधव, डॉ. रचना जाधव, डॉ. कल्याणी नाईक, डॉ.कविता ढमाले, डॉ पल्लवी शिपटे,या कार्यक्रमात सहभागी झाल्या. महिलांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण १५० महिला रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले.

Previous articleवारकरी सेवा फाउंडेशनची खेड तालुका कार्यकारिणी जाहीर
Next articleजुन्नरच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गौरव