आंबेगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर

सिताराम काळे, घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत संपणा-या १५ व नव्याने स्थापन झालेल्या २ ग्रामपंचायती अशा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम होत आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर केला असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापुर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपुर, राजेवाडी, पांचाळे बु., माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी व तिरपाड या आंबेगाव तालुक्यातील मुदत संपणा-या १५ ग्रामपंचायती असुन नव्याने स्थापन झालेल्या वडगाव काशिंबेग, वाळुंजवाडी या दोन ग्रामपंचायती आहेत अशा एकंदरीत १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रमांतर्गत ८ फेेब्रुवारी रोजी तहसिलदारांच्या वतीने प्रत्येक गावाचे गुगल मॅप नकाशे अंतिम केले जाणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करून प्रभागाच्या सीमा निश्चिती करणार तसेच अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण निश्चित करणार. १६ फेबु्रवारी प्रारूप प्रभाग रचनेच तहसिलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार. २२ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेत आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरूस्त्या करणार.

२५ फेेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या दुरूस्त्यांना तहसिलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार. २६ फेब्रुवारी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना काढली जाणार ४ मार्च विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय प्रत्यक्षात आरक्षणे काढली जाणार ५ ते १२ मार्च प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार. १५ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती उपविभागीय अधिका-यांकडे सादर केल्या जाणार २२ मार्चपर्यंत हरकतींवर उपविभागीय अधिका-यांच्या वतीने सुनावणी घेतली जाणार २५ मार्चपर्यंत हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव अभिप्रायसह जिल्हाधिका-यांकडे पाठवला जाणार ३० मार्च जिल्हाधिका-यांच्या वतीने प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार १ एप्रिल जिल्हाधिका-यांनी मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला प्रसिध्दी दिली जाणार असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Previous articleरोजगार हमी योजनेतून गावातच काम मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न मार्गी
Next articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सहसचिवपदी दिनकर महाराज निंबळे यांची निवड