रोजगार हमी योजनेतून गावातच काम मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न मार्गी

सिताराम काळे, घोडेगाव

आपटी (ता. आंबेगाव) गावात रोजगर हमीची कामे सुरू झाली आहेत. यामुळे स्थानिकांना गावातच काम मिळाले असुन रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला असुन आपटी ते जुन्नर शिव या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असल्याचे ग्रामविकास समिती जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी यांनी सांगितले.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली गावात रोजगार हमीची कामे गावातच सुरू व्हावीत यासाठी गावकरी, ग्रामविकास समितीचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. यापूर्वी लोकांना डोंगर उतरून दुस-यांच्या बांधावर अत्यल्प मजुरीने कामावर जावे लागत होते. मात्र आता गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गावात रोजगार हमी अंतर्गत स्मशानभूमी, विहिर, जुन्नर षिव यांना जोडणारे तीन रस्ते तसेच वनविभागात सलग समतल चर आदि कामे सेल्फवर असून या कामातून लोेकांना पुढील तीन ते चार महिने रोजगार मिळणार आहे. ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळाल्याने आता त्यांना इतरत्र रोजगारासाठी फिरावे लागणार नाही.

आपटी ते शिव या रस्त्याच्या कामाचे नुकतेच उद्घाटन होवून या कामास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच राजु गाडेकर, सदस्या भामाबाई गवारी, ग्रामविकास समिती सचिव दत्ता गवारी, उपाध्यक्ष संदिप गवारी, ग्रामसेविका, तांत्रिक अधिकारी, कृषी सहायक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांसाठी वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद
Next articleआंबेगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर