अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सहसचिवपदी दिनकर महाराज निंबळे यांची निवड

वडगाव मावळ-अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा सह सचिव पदी वारु (मावळ) येथील हभप दिनकर महाराज निंबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

आळंदी येथील डांगे पंच धर्मशाळा येथे पुणे जिल्हा कार्यकारीणीचा पद नियुक्ती प्रदान सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांचे अध्यक्षते खाली नुकताच संपन्न झाला.

 निंबळे महाराज यांनी अखिल वारकरी संघाचे भुषविलेले प्रसिद्धी प्रमुखपद, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मावळ तालुका सचिवपद आणि वारकरी सांप्रदायाचे कौतुकास्पद कार्य व जनमानसातील संपर्क पाहता त्यांना पुणे जिल्हा कार्यकारीणी वर सह सचिवपदी बढती देण्यात आली.

वारकरी आणि साधु संतांच्या असणाऱ्या समस्या जाणुन घेऊन मंडळाच्या माध्यमातुन त्या सोडविण्याचा आणि समाजाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे निवडी प्रसंगी बोलताना निंबळे महाराज यांनी व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह वारकरी मोठया संख्येने हजर होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहिर
Next articleआंबेठाण रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी