दौंडमध्ये माझे तिकीट प्रकाशन सोहळा संपन्न

दिनेश पवार,दौंड

टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे व रोटरी क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने माझे तिकीट(INDIA POST PHILATLY MY STAMP)प्रकाशन समारंभ दौंड येथे संपन्न झाला, यानिमित्ताने दौंड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,व आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुणे विभागाचे अधीक्षक डाकघर राजगणेश घुमारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना घुमारे म्हणाले की,पोस्टाकडील आकर्षक व्याजदर व सुरक्षित बचतीकडे सर्वसामान्य नागरिकांचा पूर्ण विश्वास आहे, पोस्टाकडील भविष्य निर्वाह निधी, टपाल जीवन विमा,आवर्ती ठेव आरडी,मुदत ठेव,मासिक प्राप्ती योजना,जेष्ठ नागरिक योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ,राष्ट्रीय बचत पत्र,किसान विकास पत्र,आशा विविध योजनांची वैशिष्ट्य तसेच नागरिकांना मिळणाऱ्या परताव्यासंबंधीत सविस्तर माहिती सांगून टपाल सेवेची उत्कृष्ट सेवा असल्याचा विश्वास व्यक्त केला,माझे टपाल विपणन अधिकारी अभिजित काळे म्हणाले की पूर्वी पासून महान व्यक्तीची टपाल तिकीट प्रसिध्द केली जातात,आता सर्वसामान्य जनतेला सुध्दा टपाल तिकीट योजनांतर्गत आपले प्रियजनांचे किंवा स्वतः चे टिकिट प्रसिद्ध करण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे,उपस्थित मान्यवरांचे स्वागत दौंड चे पोस्ट मास्तर अफरोज आत्तार यांनी तर प्रस्ताविक पुणे डाकघर उपअधीक्षक संजय भंडारी यांनी केले.

यावेळी पंचतारांकित गुंतवणूकदार व माझे टपाल उपक्रमाचे मानकरी वीरधवल जगदाळे,राजेश पाटील, डॉ.फिलोमन पवार ,सुशील शहा,भरत बागल, राजेंद्र उगले,इसाक भालेराव,राजू जगदाळे,रामचंद्र दावरा, समीर डोंबे,रामभाऊ लवांडे,खंडेराव खाडे,उल्हास मिसाळ, नगरसेवक बादशहाभाई शेख इत्यादी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले

Previous articleदौंड नगरपालिकेमार्फत आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ संपन्न
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने भगवान जाधव यांंचा “कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान