हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने भगवान जाधव यांंचा “कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक भगवान (नाना) रघुनाथ जाधव यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या प्रामाणिक व अथक परिश्रमाने अनेकांचे जीव धोक्यातून बाहेर आले तर अनेकांचे प्राण वाचले. अशा या माणसातील माणुसकी असलेल्या महामानवाचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करणे हे आद्य कर्तव्य समजून हवेली तालुका पत्रकार संघ – पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या सेवा निवृत्तीचे औचित्य साधून “कोरोना योद्धा पुरस्कार २०२१” देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, अमोल भोसले यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन उपस्थित होते.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, तनुजा भगवान जाधव,गणेश भगवान जाधव, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम, डॉ.संदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, डॉ.लक्ष्मीकांत राऊत, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, माजी सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन, ग्रामपंचायत सदस्य संतोष हरिभाऊ कांचन, अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, मयुर कांचन, माजी उपसरपंच सागर कांचन, सुनिल दत्तात्रय कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, अलंकार कांचन,सागर कांचन, डॉ. रवींद्र भोळे, डॉ. समिर ननावरे, श्रीकृष्ण बेदरे, लक्ष्मण जगताप, सुभाष बगाडे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous articleदौंडमध्ये माझे तिकीट प्रकाशन सोहळा संपन्न
Next articleकोरोना विषाणू संक्रमण काळात वैद्यकीय कर्मचा-यांनी चांगले काम केले — डॉ. रवींद्र भोळे