दौंड नगरपालिकेमार्फत आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ संपन्न

दिनेश पवार,दौंड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्यरत आहे. या दोन्ही अभियांना मध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांना या अभियानात सामावून घेण्यासाठी दौंड नगरपालिकेमार्फत विविध ऑनलाईन चित्रकला ,जिंगल,लघुपट,निबंध, कविता, माझे वैभव माझी बाग स्पर्धा,स्वच्छता स्पर्धा तसेच लाॅकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात दिलेल्या व्यक्तींचा सत्कार आणि दौंड नगरपरिषदेचे उत्कृष्ट कामगार पुरस्कार या सर्व व्यक्तींचा गौरव करण्यासाठी महात्मा गांधी ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, त्यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून दिनांक ३० जानेवारी २०२१ शनिवार रोजी सकाळी ११:०० वाजता हा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ दौंड नगरपरिषद टाऊन हॉल येथे पार पडला.

या कार्यक्रमादरम्यान पुढीलप्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.

ऑनलाईन स्पर्धांमध्ये कविता स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक गुरुनाथ कोळी, द्वितीय क्रमांक नागेश तायडे, तृतीय क्रमांक शाहरुख शेख. निबंध स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक सुप्रिया साळवे, द्वितीय क्रमांक पायल पवार, तृतीय क्रमांक अमृता भूमकर. लघुपट स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक शुभम बोधे, द्वितीय क्रमांक संदीप बारटक्के, तृतीय क्रमांक प्रियंका चुंबळकर. चित्रकला स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक हर्षदा व्हान्कांडे,द्वितीय क्रमांक चंचल अग्रवाल, तृतीय क्रमांक शैला तांदुळकर. ऑनलाईन जिंगल स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक भैरवी गटणे, द्वितीय क्रमांक पार्थ बोधे, तृतीय क्रमांक शुभम बोधे. तसेच माझे वैभव माझी बाग या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक प्रियंका रामनाथ पवार, द्वितीय क्रमांक मनोज केशवराव गाजरे आणि तृतीय क्रमांक अलका सुभाष गुंजाळ असे जाहीर झाले. या स्पर्धेमध्ये छोट्या गटातील भावेश आनंद गुंडेचा, शर्वरी राजेश यादव-पाटील यांचा सहभाग कौतुकास्पद ठरला त्यांना विशेष सहभागाबद्दल छोट्या गटातून प्रथम आणि द्वितीय असे क्रमांक बक्षीस वितरण झाले. स्वच्छता स्पर्धांमध्ये शाळा, हॉटेल्स, दुकाने, कार्यालये, हॉस्पिटल्स सोसायटी या गटामध्ये बक्षीस वितरण करण्यात आले. शाळा स्वच्छतेमध्ये प्रथम सेंट सेबस्टीअन हायस्कूल , द्वितीय लर्न अंड प्ले स्कूल, तृतीय स्व.लाजवंती गॅरेल्ला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , हॉटेल्स स्वच्छतेमध्ये प्रथम हॉटेल सिटी इन ,द्वितीय हॉटेल राजधानी ,तृतीय हॉटेल स्वानंद , दुकाने स्वछ्ता स्पर्धेमध्ये प्रथम प्रकाश इलेक्ट्रोनिक्स, द्वितीय कोहिनूर NX ,तृतीय अपना बझार , कार्यालये स्वच्छता स्पर्धेमध्ये प्रथम दौंड पोलीस स्टेशन, द्वितीय पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक दौंड, तृतीय शिवकृपा पतपेढी दौंड, हॉस्पिटल्स स्वच्छतेमध्ये प्रथम महालक्ष्मी हॉस्पिटल, द्वितीय पिरामिड हॉस्पिटल, तृतीय श्रद्धा हॉस्पिटल, सोसायटी स्वच्छतेमध्ये प्रथम गणेश सोसायटी द्वितीय देव पाल्म तृतीय प्राईड रेसिडेन्सी यांना प्रमाणपत्र व रोप भेट देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगार पुरस्कार तसेच कोरोना महामारीच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून आलेल्या सर्वांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.

या सर्व विविध स्पर्धांच्या आयोजना दरम्यान मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर, नगराध्यक्षा सौ. शीतलताई कटारिया, उपनगराध्यक्ष विलास बापू शितोळे, गटनेते राजेश गायकवाड, गटनेते बादशहा शेख, आरोग्य सभापती राजेश जाधव, शहनवाज पठाण, प्रणोती चळवादी,पुजाताई गायकवाड तसेच सर्व नगरसेवक यांचे वेळोवेळी प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमादरम्यान उत्स्फूर्त सहभागाबद्दल मा. मुख्याधिकारी यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले व भविष्यात स्वच्छतेचा आणि झाडे लावून झाडे जगवणे, पाण्याची नासाडी टाळणे अशा छोट्या गोष्टीमधून पर्यावरणाची काळजी घ्या असा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान तृप्ती लोमटे, स्मिता म्हस्के, शाहू पाटील यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव,यांत्रिकी अभियंता अमन मोमीन, लेखापाल अधिकारी गणेश रणदिवे, अकौटंट सिद्धिविनायक नलगे, प्र. आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, शहर समन्वयक शुभम चौकटे तसेच कर्मचारी वर्गामधील राजेंद्र सोनवणे, प्रवीण खुडे, सागर सोनवणे, नितीन तुपसौंदर्य, रोहन साळवे,महेंद्र गायकवाड, समीर खान, राजू वाडिया यांचे विशेष सहकार्य लाभले. ऑनलाईन स्पर्धांना बक्षीस रक्कम, वृक्षांची रोपे, प्रशस्तीपत्रक व माझे वैभव माझी बाग स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक ,स्मृतीचिन्ह तर बक्षीस स्वरुपात वृक्षांची रोपे देण्यात आली. स्वच्छता स्पर्धा विजेते तसेच लाॅकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करताना रोपे देऊन झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला.

Previous articleसामाजिक बांधिलकी जपत ढोले दांपत्याने द्वारका वृद्धाश्रमातील वृध्दांसोबत लग्नाचा वाढदिवस केला साजरा
Next articleदौंडमध्ये माझे तिकीट प्रकाशन सोहळा संपन्न