सामाजिक बांधिलकी जपत ढोले दांपत्याने द्वारका वृद्धाश्रमातील वृध्दांसोबत लग्नाचा वाढदिवस केला साजरा

राजगुरूनगर- चाकण नगरपरिषद चे नगरसेवक प्रवीणशेठ गोरे यांच्या भगिनी सौ.अंजली सुरज गोरे-ढोले अन त्यांचे पती श्री.सुरज विलास ढोले या दांपत्याने इतर खर्चाला फाटा देत वृद्धाश्रमाला मदत करुन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने द्वारका सेवासदन वृद्धाश्रम ( मौजे पुर-कनेरसर ) येथे जेष्ठ नागरिकां सोबत साजरा केला.

या वेळी ढोले दांपत्याचे सौं. कांता पवार सौ. प्रीतीताई पवार  याांनी आश्रमातील महिलांनी औक्षण केले.त्यानंतर केक कापुन ढोले दांपत्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला .यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांसोबत विजय थोरवे,आदेशशेठ गोरे,कुमार होले,अनुराग पवार अन मित्रपरिवार उपस्थित होते.

यावेळी श्री.सौ. अंजली / सुरज ढोले दांपत्यानी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना फळे / बिस्किटे वाटप करुन महिनाभर पुरेल एव्हडा किराणा ( गहु,तेल पोहे मसाले ईत्यादी ) आणि ब्लॅंकेट्स द्वारका वृद्धाश्रमला भेट दिले
द्वारका वृद्धाश्रम चे संचालक श्री.अनुराग पवार अन सौ.प्रिती अनुराग पवार यानी दानशूर ढोले दांपत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत वृद्धाश्रम अध्यक्षा कल्याणीताई पवार यांच्या वतीने आभार मानले

Previous articleशिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण मागणीचा प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे – राज्यमंत्री आदिती तटकरे
Next articleदौंड नगरपालिकेमार्फत आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ संपन्न