शशिकांत मोरे यांचा “युवा जागृती विकास” पुरस्काराने गौरव

Ad 1

चाकण- कै. डाॅ. विकासजी आबनावे यांच्या स्मरणार्थ, स्वामी विवेकानंद जयंती व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी युवा फाऊंडेशन कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष व सिद्धेगव्हाणचे आदर्श सरपंच शशिकांत मोरे यांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंचांना मानधन वाढ, तसेच त्यांच्यावर न्याय्य हक्कांसाठी लढा या बाबींचा विचार करता व गावामध्ये केलेल्या सार्वजनिक कामांची तसेच तसेच कोरोना काळामध्ये केलेली जनजागृती व अनेकांना केलेल्या मदतीची दखल घेऊन, त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कारही मिळाला आहे. त्यांना मा.आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते युवा जागृती विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी मा.आमदार मोहन जोशी, भारतीय हौशी मुष्टीयुध्द महासंघाचे उपाध्यक्ष डाॅ.मदन कोठळे,आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती रेखा प्र.आबनावे,युवा उद्योजक उमेश मोरे, विकास मोहिते, अनिल खलाटे व अनेक मान्यवर उपस्थित होते.