श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न

दिनेश कुऱ्हाडे, आळंदी-श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे २६ जानेवारी २०२१ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार डॉ. दिपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी संस्थेचे सदस्य अनिल वडगावकर, भगवान लेंडघर, पांडुरंग घुंडरे, देवराम वहिले, जनार्दन घुंडरे, रुक्मिणी कांबळे (महिला बालकल्याण सभापती आ.न.पा.), पत्रकार दिनेश कुऱ्हाडे, महर्षि वेद प्रतिष्ठान मोरे साहेब, सेवानिवृत्त शिक्षक पंडित थोरात, वारकरी शिक्षण संस्थेचे ह भ प तुकाराम महाराज मुळीक, काचगुंडे महाराज आदिंसह श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक प्रतिनिधी श्रीरंग पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी सुजाता रंधवे, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कातकरी आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण
Next articleशशिकांत मोरे यांचा “युवा जागृती विकास” पुरस्काराने गौरव