नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय योजना सर्व सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा- आमदार अशोक पवार

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करावा. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे ग्रामपंचायत सदस्यांनी पार पाडावी तसेच सदैव जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे असे मत शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याने
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य – बापुसाहेब बोधे , विठ्ठल शितोळे, भानुदास जेधे , दत्तात्रय काकडे , सचिन निकाळजे , वैशाली सांवत , राधिका काकडे , लीलावती बोधे, अश्विनी कड, मनिषा कड, मंगल पवार , पोलीस पाटील वर्षा कड यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जयसिंग भोसले, बाळासाहेब बोधे, सचिन कड, प्रविण शितोळे, अमित सावंत, पांडुरंग कड, अभिजीत सावंत, संतोष काकडे, मंगेश शितोळे, शेखर सावंत, मनोज शिंदे, चिंतामण कड, प्रफुल्ल पवार, आदी उपस्थितीत होते.