वाघोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर आमदार अशोक पवार यांची चर्चा

अमोल भोसले,उरुळी कांचन

वाघोलीच्या सर्वांगीण विकासात्मक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक नागरिकांसमवेत भेट घेतली जिल्हाचे पालकमंत्री – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हि भेट घडवून आणली शिरूर हवेलीचे आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् अशोक पवार यांनी यावेळी पाणी मालमत्ता कर आणि सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करन संबंधितांना तात्काळ निर्देश देण्यात आले. भामा आसखेड प्रकल्पातुन वाघोलीस पाणी पुरवठा, टँकरने पाणी पुरवठ्याचे विदारक वस्तुस्थिती तत्सम वार्षिक उलाढालीसह अधोरेखित करून महसुलाच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याद्वारे शासनाचा फायदा या विषयावर प्रकाश टाकला, तसेच या प्रकल्पातून वाघोली गावास पाणीपुरवठा करण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्र्यांनी ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भामा आसखेडमार्फत पाणीपुरवठा करण्याचे आदेश जारी करण्याचे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले. तसेच त्यांनी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. वाघोली पोलीस स्टेशन, नवीन वाघोली पोलीस स्टेशन सुरू करण्याबाबत आपण प्राधान्याने निर्देश जारी करण्याचे आश्वासन प्राप्त झाले. मालमत्ता कर मुल्यांकन – वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनने मालमत्ता कर मूल्यांकन आणि पुनर्प्राप्ती पद्धती वरील विषयांवर प्रकाश टाकला. तात्काळ मालमत्ता कर मुल्यांकन सहजतेने पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वाघोली ग्रामपंचायत यांना निर्देश दिले गेले.

Previous articleकिसान सभेचे आंदोलन स्थगित
Next articleनवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय योजना सर्व सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा- आमदार अशोक पवार