आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे आठ रुग्ण

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यात शुक्रवार दि.३ रोजी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ८ ने वाढ झाली असून तालुक्यात आता एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ११ झाली आहे.आज आलेल्या रिपोर्टमध्ये मंचर येथील तीन महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्या महिला अंदाजे ६३,३४,२०,वर्षीय आहेत. नारोडी येथे एक ६९ वर्षीय पुरुष,व ५२ वर्षीय व ८२ वर्षीय दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महाळूगे पडवळ येथे ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे तर खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एकलहरे येथील ४५ वर्षीय महिलेला कोरोना ची लागण झाली असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.

आतापर्यत आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ६० झाली असून त्यातील ४७ रुग्ण बरे झाले असून दोन रुग्ण मयत झाले आहेत.आज मंचर ३ ,नारोडी ३ ,म्हाळुंगे पडवळ १, एकलहरे १ असे एकूण ८ रुग्ण सापडले असून उपचार घेणारे रुग्ण ११ झाले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे तीन महिला रुग्ण सापडले असून त्यांचे वय अंदाजे ६३,३४,२४,वर्षे आहे.हे तीनही रुग्ण स्थानिक असल्याने मंचरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.दरम्यान हे रुग्ण सापडताच मंचर चे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सर्व पक्षीय नेते व्यापारी ,दुकानदार, यांची महत्त्वाची बैठक घेऊन अत्यावश्यक सेवा सोडता सर्व दुकाने व मंचर गाव पुढील काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही व्यक्तीने विनाकारण बाहेर फिरू नये तसेच मास्क व सॅनीटायजर चा वापर करावा असे आव्हाहन सरपंच गांजाळे यांनी केले आहे.

नारोडी येथे एक ६९ वर्षीय पुरुष व ५२ व ८२ वर्षीय दोन महिला असे एकूण तीन रुग्ण सापडले असून हे रुग्ण स्थानिक आहेत.हे रुग्ण याआधी सापडलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील असून यातील एक रुग्ण नारोडी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आहे.हा रुग्ण ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात असल्याने ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ,यांना होम कोरोटाईन करण्यात आले आहे.तसेच या कुटुंबातील लोकांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही होमकोरोटाईन करण्यात आले आहे.

महाळूंगे पडवळ येथील सैदमळा येथे एक ४० वर्षीय पुरुष रुग्ण सापडला असून हा रुग्ण स्थानिक शेतकरी आहे. हा रुग्ण नक्की कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाला हे अजून समजू शकले नाही मात्र या रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाच्या कुटुंबातील सर्वांना तपासणीसाठी मंचर येथील भीमाशंकर रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांना कोरोटाईन करण्यात आले आहे.

एकलहरे येथे एक ४५ वर्षीय महिला कोरोना रुग्ण सापडला असून या महिलेवर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या महिलेचा मंचर येथील क्रीडा संकुल येथे छोटेसे हॉटेल आहे काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने तिला पुणे येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तिची कोरोना चाचणी केली असता तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.या महिलेच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना होम कोरोटाईन करण्यात आले आहे.दरम्यान आंबेगाव तालुक्यात कोरोणाचे रुग्ण वाढल्याने आंबेगाव करांच्या चिंतेत भर पडली आहे कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये लांबचा प्रवास टाळावा, मास्क व सॅनी टायजरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमंचर येथे चोवीस वर्षीय तरुणाची पंख्याच्या हुकाला घेऊन गळफास आत्महत्या
Next articleप्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल ;नारायणगाव पोलिसांची कारवाई