प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल ;नारायणगाव पोलिसांची कारवाई

किरण वाजगे नारायणगाव

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या हद्दीमध्ये दुकाने चालू ठेवून सोशल डिस्टिंक्शन तसेच इतर नियमांचे पालन न करणाऱ्या सहा दुकानदार व दोन हॉटेल व्यावसायिकांवर नारायणगाव पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. नारायणगाव येथील जुन्नर रस्त्यावरील काशिद इंटरप्राईजेस, काशीद किराणा, तसेच वारुळवाडी हद्दीतील भागेश्वर इलेक्ट्रिक हाउस, भागेश्वर किराणा दुकान, साई किराणा स्टोअर्स, कॉलेज रोडवरील ओमकार किराणा या दुकानांमध्ये ग्राहकांनी मास न लावता व पाच पेक्षा अधिक ग्राहक उपस्थित राहुन सोशल डिस्टिंक्शन पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. तसेच नारायणगाव येथील पुणे नाशिक हायवे वरील हॉटेल साई समृद्धी व हॉटेल यशोधन यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याच दुकानदारांनी सॅनिटायझर तसेच हात पाय धुण्यासाठी ग्राहकांसाठी पाण्याची व्यवस्था केली नव्हती. म्हणून उमर गफूर तांबोळी, अस्लम इब्राहीम तांबोळी, बाळासाहेब बबन वारुळे, दिनेश सदाशिव मेहेर, मनीषा संजीव उकिर्डे, अनिल विश्वास भुजबळ, चिराग राजेंद्र कोराळे व महेश रघुनाथ वालझाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये डबलसीट दुचाकी चालवणार्‍या ४० जणांवर कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रचलित कायद्या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार कैलास ढमाले, पोलीस हवालदार कोकणे, पोलीस हवालदार सातपुते , पोलीस नाईक जढर हे करीत आहे.
याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले की विनाकारण गावांमध्ये फिरणाऱ्या ग्रामस्थांवर तसेच कोरोना बाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Previous articleआंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे आठ रुग्ण
Next articleवाढीव वीज बिलांबाबतच्या तक्रारी संदर्भात शिबिरांचे आयोजन करून तक्रारींचे निवारण करा खासदार डॉ. अमोल कोल्हे