मंचर येथे चोवीस वर्षीय तरुणाची पंख्याच्या हुकाला घेऊन गळफास आत्महत्या

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर (ता.आंबेगाव) येथे राहणाऱ्या चोवीस वर्षीय सिद्धेश सुनील थोरात या युवकांने राहत्या घरात पंख्याच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत त्याचे वडील सुनील थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दि,२ रोजी फिर्यादी सुनील थोरात हे आपल्या हॉटेल श्रुती खानावळ येथे असताना त्याचा मुलगा सिद्धेश हा घराची चावी घेण्यासाठी आला होता त्याला घराची चावी देऊन सुनील थोरात हे हॉटेलमधली सर्व कामे उरकून रात्री बारा वाजता घरी गेले असता त्यांच्या घरातील सेफ्टी दरवाजा बंद होता व आतील दरवाजा उघडा होता त्यांनी हात घालून दरवाजा उघडून आत गेले असता घरातील लाईट लावली असता किचनमध्ये त्यांचा मुलगा सिद्धेश यांनी गळफास घेतल्याचे दिसले त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले तसेच पोलिस व खाजगी आम्हाला बोलावून त्यांच्या मदतीने सिद्धेशला खाली घेत रुग्णवाहिका द्वारे मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून ते रात्री १०:३० वाजण्याच्या पूर्वीच मृत झाले असल्याचे सांगितले .या घटनेची फिर्याद सुनील थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास मंचर पोलीस पोलीस करत आहेत.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे या़ंच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार गणेश डावखर करत आहेत

Previous articleमंचर येथून अठरा वर्षाची तरुणी बेपत्ता
Next articleआंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे आठ रुग्ण