दिव्यांग व्यक्तींना मोफत किराणा किट वाटप

राजगुरूनगर-राज्यमंञी बच्चुभाऊ कडू यांनी स्थापन केलेल्या संस्थापक अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत किराणा कीट वाटप तसेच जयपूर फुट आरोग्य तपासणी शिबिर खेड येथे आयोजित केले होते.

या प्रसंगी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे,
बाजार समिती सभापती विनायक घुमटकर ,रा. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास राव सांडभोर, गटविकास अधिकारी अजय जोशी , सभापती भगवान पोखरकर, प्रताप ढमाले, मा. सभापती अंकुश राक्षे, प.समिती सदस्य अरुण चौधरी, अरुण शेठ चांभारे तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.१०० दिव्यांगांना मोफत किराणा किट वाटप केले. ३० जयपूर फुट मोजमाप घेतले.

ॲड सुनिल बांगर , नितिन पाटील, राम गोरे, पोलिस अधिकारी अरविंद चौधरी सर, श्री. अनिल बारणे, रजाक शेख, अशोक वंजारे , शैलेश मोहिते यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच नवीन पंचायत समितीच्या इमारतीत दिव्यांग भवन आणि इतर अनेक योजना मिळवून देण्यासाठी आश्चासन दिले

प्रहार दिव्यांग संघटना खेड तालुका अध्यक्ष कु. अर्चना घुंडरे , शिवव्याख्याते श्री. संदीप बारणे, श्री. राजेंद्र सुपेकर,श्री. जिवन टोपे, श्रीमती. जान्हवी बोत्रे ,श्री. भरत काळोखे, सुदाम बोरकर, नाशिक जिल्हा चंद्रभान गांगुर्डे , उपस्थित होते. वामन बाजारे यांनी सुञसंचलन केले .प्रस्तावना – शिवव्याख्याते श्री संदीप बारणे सर यांनी केली .आभार – कु. अर्चना घुंडरे. यानी मानले

Previous articleनारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सोलर लाईट प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न
Next articleपोलीस असल्याचा बहाणा करत निवृत्त कृषी अधिकाऱ्याची दोन तोळ्याची चैन व साडेसात ग्रॅमची अंगठी चोरट्यांने पळवली