पोलीस असल्याचा बहाणा करत निवृत्त कृषी अधिकाऱ्याची दोन तोळ्याची चैन व साडेसात ग्रॅमची अंगठी चोरट्यांने पळवली

प्रमोद दांगट निरगुडसर

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे अवसरी फाट्यावर पोलीस असल्याचा बहाणा करत निवृत्त कृषी अधिकारी भैरवनाथ मारुती शिंदे यांना फसवून अज्ञात चोरट्याने दोन तोळ्याची चैन व साडेसात ग्रॅमची अंगठी पळवली असल्याची घटना दि.२२ रोजी घडली आहे.

याबाबत भैरवनाथ मारुती शिंदे (रा.अवसरी खुर्द ता.आंबेगाव जि.पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे हे शुक्रवार दि .२३ सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी गेले असता पेट्रोल भरून येत असताना अवसरी फाटा येथे एका अज्ञात इसमाने दुचाकीवर मागून येत त्यांना थांबविले, व शिंदे यांना म्हणाला की आमच्या साहेबांनी शिट्टी मारली असता तुम्ही का थांबले नाही तुमच्याकडे गांजा असण्याचा आम्हाला संशय येत आहे असे म्हणत दमबाजी केली.

यावेळी त्याने शिंदे यांच्या वाहनाची डिकी व खिसे चेक करत, वाहनाची कागदपत्रे मागितली व धमकी देऊन शिंदे यांच्याकडे असणारे गळ्यातील दोन तोळ्याची चैन व साडेसात ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली एकूण अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचे सोने चोरट्याने लंपास केले आहे. याप्रकरणी शिंदे यांची फसवणूक झाली म्हणून त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी याच पद्धतीने मंचर येथील पिंपळगाव फाट्यावर दोन व्यक्तींना अशाच प्रकारे लुबाडण्यात आले होते. सदर घटना गंभीर असल्याने मंचर पोलिस सदर तोतयाचा शोध घेत आहे.

Previous articleदिव्यांग व्यक्तींना मोफत किराणा किट वाटप
Next articleघोडनदीत अवैध्यरित्या वाळुचा उपसा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल