नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सोलर लाईट प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

नारायणगाव (किरण वाजगे)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत ईमारत १३ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.


जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिकाताई डेरे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांसह ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी सरपंच योगेश पाटे म्हणाले की, या सौरऊर्जा प्रकल्पावार नारायणगाव गावठाण हद्दीतील स्ट्रीट लाईट चालणार असून दर महिन्याला येणार्‍या जवळपास १ लाख रुपये बिलात सुमारे ५० ते ६० टक्के बचत होणार आहे. तर ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे १० ते १५ हजार रुपयांचे बिल देखील वाचणार असून या बचत झालेल्या पैशाचा सद्पयोग गावच्या विकासासाठी करता येणार असुन ग्रामपंचायत पातळीवरचा हा सर्वात मोठा स्ट्रिटलाईट व इमारत सौरउर्जा प्रकल्प असल्याची माहिती देत स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गॅस शवदाहिनी, पाणी पुरवठा योजना, भव्य गार्डन, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवरचा सर्वात मोठा सोलर प्रकल्प असे अनेक पथदर्शी प्रकल्प राबवले जात असून ही कौतुकाची बाब आहे. यापुढच्याही काळात अधिक चांगल्या पद्धतीने गावचा विकास होईल यात शंका नाही.
यानिमित्तानं सरपंच योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच उपसरपंच सारिका डेरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

याप्रसंगी अरविंद ब्रम्हे, संतोषनाना खैरे, आशिष माळवदकर, अॅड.राजेंद्र कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी मनोगत व्यक्त केले.

याकार्यक्रमाला जि.प.सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्यचे संचालक संतोषनाना खैरे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर खळदे, मारुती फुले, रोहिदास तांबे, अरविंद ब्रम्हे, मंगल चिंतामणी, उद्योजक अभय कोठारी, किसन डेरे, अॅड.कुलदिप नलावडे, अॅड.राजेंद्र कोल्हे, सुरेश वाणी, रविंद्र कोल्हे, संजय थोरवे, अतुल कांकरिया, अमर भागवत, मंगेश पाटे, प्रा.अशफाक पटेल, योगेश रायकर, धनंजय माताडे, किशोर वारुळे, जितु आंद्रे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ शिवसैनिक पत्रकार मित्र, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

या सोलर लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक अशफाक पटेल यांनी केले. सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे यांनी तर आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Previous articleसोरतापवाडीत गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगाराला केले जेरबंद
Next articleदिव्यांग व्यक्तींना मोफत किराणा किट वाटप