सोरतापवाडीत गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगाराला केले जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पुणे-सोलापूर रोडने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सोरतापवाडी इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे समोर  महमद अलीहुसेन खान (वय १९)  याला ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर कमरेला बाळगलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असा मोबाइलसह एकुण किं.रु. ५६,०००/- (छपन्न हजार रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, स.फौ. दत्तात्रय गिरमकर, पो.हवा. महेश गायकवाड, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. सचिन गायकवाड, पो.हवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, पो.कॉ. अक्षय जावळे यांनी केलेली आहे.

Previous articleगडद ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी चंद्रकांत शिंदे विजयी
Next articleनारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सोलर लाईट प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न