गडद ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी चंद्रकांत शिंदे विजयी

राजगुरूनगर-मुंबई स्थित विविध संस्थावंर काम करत असताना गावच्या विकास कांमाची ओढ़ लागून सर्वसाधारण पुरुष वर्गातुन गडद ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा धाडशी निर्णय घेतलेले चंद्रकांत किसन शिंदे यांची गडद ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले चंद्रकांत शिंदे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समजले जातात. त्यांनी सांस्कृतिक, कला, क्रीडा, आणि शैक्षणिक अश्या अनेक गावच्या विकास कामात सहभाग घेत मोलाच सहकार्य केले आहे.

आपल्या स्वप्नातील सर्वांगीण गावचा विकास करण्याचा मानस धरून गावची निवडणूक लढवली. भविष्यात ग्रामपंचायत मधे पदाची अपेक्षा न बाळगता गावचा सर्वांगीण विकास करुंन गडद गावच नाव जागतिक पातळी वर उंचवन्याचा प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले…

Previous articleकमान ग्रामपंचायतवर श्री भैरवनाथ महाराज जनसेवा विकास पॅनलचे वर्चस्व
Next articleसोरतापवाडीत गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगाराला केले जेरबंद