काळूस ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

चाकण : खेड तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या काळूस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री काळेश्वर ग्रामविकास पॅनलचे १० सदस्य,तर विरोधी पॅनलचे ५ सदस्य निवडून आले आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे खंदेसमर्थक माजी सरपंच गणेशशेठ पवळे यांच्यासह सहकाऱ्यांनी काळूस ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे.

काळूस ग्रामपंचायत मध्ये कु.दत्तात्रय नामदेव पोटवडे हे निवडून आले आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या गावात सर्वात कमी २३ व्या वर्षी निवडून येण्याची किमया त्यांनी साधली आहे.त्यांनी थोड्या फरकाने नाही तर  १९१ मतदानाच्या फरकाने ते निवडून आले आहेत. एवढ्या मोठ्या गावात त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.

 

काळेश्वर ग्रामविकास पॅनलचे यशवंत रंगनाथ खैरे, मोहन ज्ञानोबा पवळे, संजय बाबुराव कदम,दत्तात्रय नामदेव पोटवडे,संदिप लक्ष्मण टेमगिरे, धनश्री गणेश पवळे, नम्रता पवन जाचक, राधाबाई पाटीलबुवा आरगडे, वृषाली बाबाजी खैरे, नितीन काळूराम दौंडकर हे सदस्य विजयी झाले आहेत

या निवडणूकीत गणेश तुकाराम पवळे मा.सरपंच/संचालक आण्णासाहेब मगर सहकारी बँक, ज्ञानेश्वर मारुती वाटेकर संचालक खरेदी विक्री संघ खेड, श्री बारकुशेठ जयवंत जाचक चेअरमन , धोंडिबा कुंडलीक पवळे मा सरपंच , विठ्ठलशेठ आरगडे, योगेश मोहन आरगडे मा सरपंच , विश्वनाथ पोटवडे चेअरमन , पवनराजे जाचक, नवनाथ आरगडे, नवनाथ दौंडकर, शिवाजी पवळे , बाळासाहेब साळुंके, रोहिदास आबा पवळे,दत्तात्रेय मोरे , संदीप पोटवडे ,संदिप टेमगिरे,सुभाष आरगडे, भगवान खैरे ,बाळासाहेब  आरगडे , सिताराम वाटेकर, दिलिप शेठ येळवंडे , सचिन पवळे, नवनाथ शेठ फडके,संतराम कौटकर मा चेअरमन, दत्तात्रेय कौटकर ऊद्योजक, विश्राम कौटकर,सुभाष गायकवाड, सागर रोकडे, विलास हटाळे,नवनाथ पवळे, भगवान पोटवडे, विलास खैरे , काळूराम हबती कौटकर, अशोक गायकवाड , भाऊसाहेब दौंडकर यांनी नेतृत्व केले.

Previous articleवाकळवाडीची उच्चशिक्षित शिवराज्ञी पवळे ठरली राज्यातील सर्वांत तरुण सदस्य
Next articleसलग सात वेळा निवडून येण्याचा अशोक दादा राक्षे यांनी केला विक्रम