सलग सात वेळा निवडून येण्याचा अशोक दादा राक्षे यांनी केला विक्रम

राजगुरूनगर- राक्षेवाडी (ता.खेड) येथील अशोक राक्षे यांनी सलग सातवेळा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याचा विक्रम केला आहे. राक्षे यांनी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पद भूषवले आहे तसेच विद्यमान संचालक व राक्षेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य आहेत.

ह्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत अशोकदादा बबन राक्षे यांनी राक्षेवाडी ग्रामपंचायतीवर सलग सातव्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या निवडीचे ग्रामस्थ तसेच तालुक्यातील समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत राक्षे यांना १९९२ पासुन कामकाज पाहण्याचा अनुभव आहे. ग्रामपंचायतीमध्ये दोनदा बिनविरोध निवड आणि एका पंचवार्षिकमध्ये उपसरपंच व दुसऱ्या वेळी सरपंच असा अशोक दादा राक्षे यांचा ३५ वर्षांचा राजकीय प्रवास आहे.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील राजकीय घडामोडी हाताळल्या आहेत.

Previous articleकाळूस ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
Next articleआंबेगाव तालुक्यात ४२ बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दिष्ट-गटविकास अधिकारी जालिंदर पठारे