वाकळवाडीची उच्चशिक्षित शिवराज्ञी पवळे ठरली राज्यातील सर्वांत तरुण सदस्य

राजगुरूनगर- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आलेली कु.शिवराज्ञी धर्मराज पवळे ह्यांचे वय २१ वर्ष २ महिने असून त्या राज्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य असल्याची चर्चा खेड तालुक्यात आहे.

सात सदस्य असलेल्या वाकळवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन सदस्य बिनविरोध झाले होते. माजी सरपंच आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या शैलजा दिनकर वाळुंज यांच्या विरुद्ध शिवराज्ञी धर्मराज पवळे यांची थेट लढत झाली. अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत पवळे ह्यांना १८४ मते मिळाली तर वाळुंज ह्यांना १०६ मतांवर समाधान मानावे लागले. राज्यशास्त्र विषयात पदविधर आणि पत्रकारीतेची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित शिवराज्ञी पवळे यांच्या विजयाने त्या सर्वांत तरुण सदस्य ठरल्या आहेत.

शिवराज्ञी पवळे यांचा खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, सुरेखाताई मोहिते पाटील तसेच वाकळवाडी ग्रामस्थांनी सन्मान केला

Previous articleवाकळवाडीची उच्चशिक्षित शिवराज्ञी पवळे ठरली राज्यातील सर्वांत तरुण सदस्य
Next articleकाळूस ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा