मंचर येथून अठरा वर्षाची तरुणी बेपत्ता

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोबीमळा येथील अठरा वर्षीय तरुणी सुजाता ननवरे ही घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेली असून तीचा शोध घेतला असता ती सापडली नसल्याने ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर ( ढोबीमळा) येथे बेपत्ता तरुणी ही आपल्या राहत्या घरी बुधवार दि.१ रोजी पहाटे ६ वाजल्याच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेली होती बराच वेळ ती घरी न आल्याने तिचा सगळीकडे शोध घेतला तसेच नातेवाईक ,व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही, याबाबत सुजाता बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

बेपत्ता सुजाताचे वर्णन

पुढीलप्रमाणे सुजाता साहेबराव ननवरे (वय १८) रा.मंचर ढोबीमळा ता. आंबेगाव जि.पुणे, उंची पाच फूट, रंग निमगोरा ,अंगाने सडपातळ, केस काळे लांब, अंगात चॉकलेट रंगाचा टॉप ओढणी, काळ्या रंगाची लॅगीज,असा असून सदर तरुणी कुठे आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याची संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे या़ंच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार गणेश डावखर करत आहेत.

 

Previous articleकोरोना निर्मूलनासाठी राज्य सरकारने तात्काळ वैद्यकीय साधने उपलब्ध करून द्यावी- महापौर मुरलीधर मोहोळ
Next articleमंचर येथे चोवीस वर्षीय तरुणाची पंख्याच्या हुकाला घेऊन गळफास आत्महत्या