कोरोना निर्मूलनासाठी राज्य सरकारने तात्काळ वैद्यकीय साधने उपलब्ध करून द्यावी- महापौर मुरलीधर मोहोळ

Ad 1

अतुल पवळे पुणे

पुण्यातील कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात संपन्न झाली.

यावेळी खालीलप्रमाणे मुद्दे आणि मागण्या आपल्या पुणे शहराच्या वतीनं मी केल्या.आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलैअखेर रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल, याचा विचार करता आयसोलेशन बेडस ६१४,आयसीयू बेड ४००,आणि व्हेंटिलेटर बेडस २०० ने कमी पडण्याची शक्यता आहे, तरी यासाठी राज्यसरकारने बेडसची उपलब्धता करून द्यावी.खाजगी लॅब व खाजगी हॉस्पिटल यांचा आणि महापालिकेचा समन्वय अधिक चांगला होणे गरजेचे आहे, यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी.महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत ८० हॉस्पिटलना कोरोनाच्या उपचार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला २५ कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर येणार आहे. पूर्वीचा १७५ कोटी आणि आत्ताचा २५ कोटी असा आर्थिक बोजा महापालिकेवर बसणार आहे, तरी राज्यसरकारने याबाबतीत विचार करण्याची गरज आहे.खाजगी लॅबच्या माध्यमातून स्वॅब तपासणीसाठी प्रतिरूग्ण १८०० रुपये महापालिका निधीतून उपलब्ध करून देणार आहे. टेस्टिंग क्षमता वाढविणे, महापालिकेच्या यंत्रणांमध्ये डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे, तरी ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

आर्थिक परिस्थिती चांगला असलेला रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी गेल्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर तीव्र, मध्यम लक्षणे आहेत ते न पाहता सर्व कुटुंबासाठी ४-५ बेडस पादाक्रांत करतात, त्यामुळे गंभीर रुग्णाला बेड मिळत नाहीत. यासंदर्भात खाजगी हॉस्पिटलला सूचना दिल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली. आर्थिक क्षमता चांगली असणार्‍या नागरिकांनी, त्याचे रीपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या क्वारनंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरमध्ये भरती व्हावे, जेणेकरून खाजगी हॉस्पिटल मध्ये गंभीर रुग्ण व को – माॅबिड रुग्णांची खाजगी हॉस्पिटल जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी हॉस्पिटलनी विचार करावा यासंबंधी सूचना मांडल्या.बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.