घोडेगाव पोलीसांचा काळेवाडी-दरेकरवाडी व गिरवली या गावांमध्ये रूटमार्च

सिताराम काळे घोडेगाव

 आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गावात शांतता रहावी, निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणतेही गालबोट लागू नये, कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी घोडेगाव पोलीसांच्या वतीने काळेवाडी-दरेकरवाडी व गिरवली या गावांमध्ये रूट मार्च करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक लहु शिंगाडे यांच्या मार्गदर्षनात रूट मार्च पार पडला. राजकीय दृष्टया संवेदनशिल असलेल्या काळेवाडी-दरेकरवाडी व गिरवली ग्रामपंचायत परिसरामध्ये हा रूटमार्च आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दंगा नियंत्रण पथकासह पोलीस कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.

Previous articleजिजाऊंच्या कर्तृत्वाची गावा गावात पारायणे व्हावी – दशरथ यादव
Next articleफुलझाडांची रोपे देऊन सवाशीण महिलांचा सन्मान