फुलझाडांची रोपे देऊन सवाशीण महिलांचा सन्मान

राजगुरूनगर : चिखलगाव येथील कडलग कुटुंबाने लग्नासाठी आलेले सवाशीण महिलांना फुल झाडांची रोपे भेट देऊन सन्मान केला.

‘एक वृक्ष जीवनाचा’ या संकल्पनेतून या परिवाराने व-हाडी मंडळींना रोपांचे वाटप करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. त्याच्या पर्यावरणपूरक निर्णयाचे व त्याची अंमलबजावणी करणाच्या कडलग परिवाराचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

लग्नमंडपात महिलांच्या हातात रोपे असल्याचे आगळेवेगळे चित्र लक्ष वेधून घेत होते. पै-पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यापुढील काळातही परिवारातील विविध कार्यक्रमांत पर्यावरणविषयक जागृतीचा उपक्रम कायम ठेवणार असल्याचे कडलग कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

Previous articleघोडेगाव पोलीसांचा काळेवाडी-दरेकरवाडी व गिरवली या गावांमध्ये रूटमार्च
Next articleनारायणगाव मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी