जिजाऊंच्या कर्तृत्वाची गावा गावात पारायणे व्हावी – दशरथ यादव

अमोल भोसले,उरुळी कांचन

राजमाता जिजाऊसाहेब यांची प्रेरणा घेऊन समाजात महिला वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षम झाल्या आहेत. अंधश्रद्धा रुढी परंपरेचे बंधने तोडून विचारातून स्वराज्य उभे करण्यात जिजाऊंचे मोठे योगदान होते. त्यांचा सत्य इतिहास लोकांसमोर येणे गरजेचे आहे, त्याचबरोबर जिजाऊंच्या विचारांची गावोगावी पारायणे झाली पाहिजेत तरच पुन्हा शिवराज्य उभे राहील समाज सक्षम करण्यासाठी इतिहासाचे संशोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले .

पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने माळशिरस येथे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे आज संभाजी ब्रिगेड पुरंदर कडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. जिजाऊ जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड कडून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम कामठे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवी दशरथ यादव, संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सागर पोमन, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा राणी थोपटे, उज्वला कामठे, संभाजी ब्रिगेड पुरंदरचे अध्यक्ष संदीप बनकर, कार्याध्यक्ष संतोष यादव जिजाऊ ब्रिगेड पुरंदर अध्यक्षा दूर्वा उरसळ, संभाजी ब्रिगेड माळशिरस अध्यक्ष अरविंद जगताप, ह.भ.प लक्ष्मण महाराज, माजी सरपंच सुनील यादव, सारथी संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते. मिठाई वाटप करुन या कार्यक्रमाचे सांगता झाली.

“यापूर्वी ग्रामीण भागात जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत नव्हता मात्र संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून येणार्‍या काळात गावोगावी जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जाईल. “ असे संदीप बनकर यांनी सांगितले.

Previous articleघोडेगाव पोलीस ठाण्यात राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
Next articleघोडेगाव पोलीसांचा काळेवाडी-दरेकरवाडी व गिरवली या गावांमध्ये रूटमार्च