नारायणगावात एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणा-या दोन चोरट्यांना पोलीसांनी रंगेहात पकडले

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही घटना बुधवार दि ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन ची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.

सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये या वर ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि.३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पो. उपनिरीक्षक हिंगे,  पोलीस नाईक दिनेश साबळे , पो.नाईक शेख, होमगार्ड ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम चेक करत होते. यावेळी होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय.ए.टी.एम मध्ये दोन इसम एटीएम मशीन चे शटर अर्धे लावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्याच्या जवळील लोखडी टॉमी ने होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

याबाबत  सहाय्यक पो.निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना माहिती देऊन लागलीच पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होमगार्ड ढवळे, खंडे पोलिसमित्र भरत मुठे, ईश्वर पाटे ऋषिकेश कुंभार व इतर २० ते ३० असे त्या ठिकाणी जमा झाले.
या घटनेतील आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पो.ना.लोंढे,पो ना साबळे,पो.कॉ वाघमारे, कोबल यांनी शटर वर करून सदर आरोपीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले.
त्यातील आरोपी १) राहूल वसंत सुपेकर मुळ रा निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि नगर सध्या रा रांजणगाव एम.आय.डी.सी.२) बाजीराव बाळासाहेब नागरगोजे मुळ रा चिंचपुर ता पाथर्डी जि नगर सध्या रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३५३,३३२,३८०,४२७, ५११,३४ वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक हिंगे हे करत आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक पाटील, उपविभागीय पो. अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होमगार्ड ढवळे, खंडे यांनी केली आहे.

Previous articleशेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त-डॉ.भगवानराव कापसे
Next articleकै.अर्जुनराव टाकळकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण संपन्न