महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून एस एम देशमुख यांची नियुक्ती होणे गरजेचे- बापूसाहेब गोरे

 अमोल भोसले,उरुळी कांचन -प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलचे राज्य निमंत्रक बापूसाहेब गोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे व सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील असंख्य पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले की महाराष्ट्रात सध्या विविध क्षेत्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती केली जाणार असून त्यामध्ये पत्रकार प्रतिनिधींचाही समावेश आहे. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे १५ वर्षांपासून पत्रकारांच्या विविध समस्यासाठी मोर्चे,आंदोलने करीत असून त्यांच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण कायदा व पत्रकार पेन्शन सारखे प्रश्न मार्गी लागले आहेत. पत्रकारांचे अजून घर,वैद्यकीय सुविधा,तालुका पत्रकार भवन यासारखे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबीत आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात पत्रकारांचा प्रतिनीधी जाणे आवश्यक आहे आणि त्यासाठी एस एम देशमुख यांचे नाव अग्रभागी आहे.

ते पुढे म्हणाले महाराष्ट्रातील पत्रकारांनी एस एम देशमुख यांच्या नावाला पसंती दिल्यानेच मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे मुख्य विस्वस्त एस एम देशमुख यांचे नावाचा आग्रह धरला असून त्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना ईमेलद्वारे मागणीचे निवेदने पाठविली असून अनेकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत.

राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी दरम्यान चांगला प्रतिसाद दिल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्याचेही गोरे यांनी सांगितले.

Previous articleकुरवंडी व कोल्हारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह साजरा
Next articleयुवासेना उपतालुका प्रमुख पै.अजिंक्यदादा गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ रक्तदात्यांचे रक्तदान