युवासेना उपतालुका प्रमुख पै.अजिंक्यदादा गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

राजगुरुनगर- कोरोनाच्या पाश्वभूमी वरती महाराष्ट्राला अपुरा पडत असलेला रक्त साठा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जय मल्हार मित्र मंडळ आयोजीत युवासेना उपतालुका प्रमुख पै.अजिंक्यदादा गाडे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अस रक्तदान शिबिर च आयोजन करण्यात आले होते श्री.क्षेत्र खरपुडी खुर्द खंडोबाची या छोट्याशा गावातील 25 तरुणांनी लॉकडाऊन मध्ये रक्तदान केले होते तर 25 तरुणांना काही कारणास्तव रक्तदान करता आले नाही तर कोरोना रोगा मुळे गावा बाहेरील कोणत्याही व्यक्तीस रक्तदान करण्यास येण्यास गावाने परवानगी दिली नव्हती परंतु अजिंक्यदादा ने व त्यांच्या सर्व सहकार्याने ठरविले होते 50 चा आकडा फार करायचा व छोटस गाव असताना देखील 51 शूरवीरांनी रक्तदान केले.

यारक्तदान शिबिराची सुरवात शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.यावेळी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सोपान गाडे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप गाडे, मा उपसरपंच गणेश गाडे, खजिनदार रामभाऊ गाडे, संचालक संभाजी गाडे,उपाध्यक्ष पंडीत गाडे,मा.सरपंच निवृत्ती गाडे,अध्यक्ष सुदामभाऊ गाडे, मा. उपसरपंच बंडोपंत गाडे,अध्यक्ष मुरलीधर गाडे व इतर मान्यवर उपस्थित होते

तसेच ब्लड बँक ही पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक होती. त्याचे मुख्य डॉक्टर डॉ संतोष कांबळे सर डॉ दीपक पाटिल सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते

याप्रसंगी संचालक संभाजी गाडे, मा सरपंच निवृत्ती गाडे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप गाडे, सरपंच प्रशांत गाडे यांनी व गावातील इतर सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यानी रक्तदान केले तसेच कार्यक्रमाला व अजिंक्य ला सदिच्छा शुभेच्छा भेट खेड पंचायत समितीच्या प्रथम महिला उपसभापती मा.सौ.ज्योतीताई अरगडे व सरपंच केशवराव अरगडे यांनी दिली. तसेच सकाळ पासून सर्व कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन प्रणित गाडे, संदेश डेरे,अभिजीत गाडे, शुभम डेरे,शंकर गाडे, इंद्रजीत गाडे,दीपक गाडे,सोमनाथ गाडे, अभिषेक गाडे यांनी केले

Previous articleमहाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून एस एम देशमुख यांची नियुक्ती होणे गरजेचे- बापूसाहेब गोरे
Next articleसाताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला;