शिक्रापूर येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी पळवले

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या दोन एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २५) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फोडून त्यामधील सुमारे १९ लाख ५० हजार रुपये व एक एटीएम मशिन स्कॉर्पिओ गाडीत टाकून पळ काढला. याबाबत सकाळी माहिती कळताच घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी पाहणी केली. शिक्रापूर येथे स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडून लाखो रुपयांची चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नसल्याने चोरीचे प्रकार वाढत आहेत.

शुक्रवारी बँकेला सुटी असल्यामुळे सकाळी उघडकीस आलेला प्रकार समजूनदेखील अधिकारीवर्ग उशिरा आला. मशिनमधील १९ लाख ५० हजार व अडीच लाखांची मशिन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल रक्कम चोरीला गेला. तीन चोरटे पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीमधून आले. एटीएम सेंटरजवळ गाडी लावून त्यांनी ही चोरी केली. महिलेच्या वेशात येऊन त्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. या घटनेचा तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एन. वी. रानगट करीत आहेत.

Previous articleलोणी काळभोर पोलिस स्टेशनच्यावतीने पोलीस पाटीलांचा प्रशंसापत्र देऊन गौरव
Next articleशेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त-डॉ.भगवानराव कापसे