लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्यावतीने पोलीस पाटीलांचा प्रशंसापत्र देऊन गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्यात कोरोना महामारीच्या काळात पोलीस पाटलांनी आपपल्या गावात जबाबदारीने काम केले. त्यामुळे पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला मोठी मदत झाली. यापुढेही पोलीस पाटलांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस पाटलांनी सुद्धा चांगले काम केले आहे असे प्रतिपादन लोणी काळभोर (ता.हवेली) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हस्ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना बंडगर बोलत होते.

कोरोना काळात सर्वच गावातील पोलीस पाटलाचे काम उल्लेखनीय आहे. पोलीस पाटलांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय कोरोना निर्मूलनसाठी मोठा सहभाग घेतला. शासनाने दिलेली सर्व जबाबदारी पोलीस पाटील यांनी समर्थपणे पार पाडली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय बोरकर, पोलीस पाटील दादा काळभोर, विजय टिळेकर, रोहिणी हांडे, वर्षा कड, दत्ता चौधरी, मिलिंद कुंजीर, मोहन कुंजीर, प्रियंका भिसे, सोनाली शिवरकर, रेश्मा कांबळे, स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous articleभांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती – खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleशिक्रापूर येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी पळवले