नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत रक्तदान शिबीर

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच रक्त पुरवठा कमी होत असल्याची शंका व्यक्त केली होती. तसेच रक्तदान शिबीरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक डि.डि.भोसले, माजी नगरसेविका मालती कुऱ्हाडे,रमेश गव्हाणे,मनोज कुऱ्हाडे,रोहन कुऱ्हाडे,तेजस कुऱ्हाडे,प्रशांत घुंडरे,प्रसाद बोराटे उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते.त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे नगरसेवक नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांनी सांगितले.या शिबिरात १०१ रक्तदात्यानी रक्तदान केले तसेच मथुराबाई वसिष्ठ बल्ड बँक केईएम हॉस्पीटल पुणे यांनी रक्त संकलित केले.

Previous articleबेल्ह्यात ८ गुंठ्यातील कांदारोप लंपास:बटाटा, कांदा चोरीनंतर शेतकऱ्यांपुढे नवे संकट
Next articleचिंचबाईवाडी येथील अतिक्रमण न काढल्याने शेतकऱ्याने दिला आत्महत्या करण्याचा इशारा