चिंचबाईवाडी येथील अतिक्रमण न काढल्याने शेतकऱ्याने दिला आत्महत्या करण्याचा इशारा

प्रशासनाच्या कागदी घोड्यांना कंटाळून मच्छिंद्र गार्डी यांनी घेतले टोकाचे पाऊल

 राजगुरुनगर-नैसर्गिक ओढा व शेतात झालेल्या अतिक्रमण मोकळे करून देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे गेले अनेक दिवस पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने पाण्यात स्वतःला बुडवून जीवनाचा अंत करीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

 

चिंचबाईवाडी (ता.खेड) येथील शेतकरी मच्छिंद्र भाऊ गार्डी यांनी अतिक्रमण काढले नाही तर आत्महत्या करण्याचे निवेदन प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड यांना देण्यात आले आहे. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दि. १२ जून २०२० रोजी त्याठिकाणाचे मंडलाधिकारी यांना अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिले असताना देखील तेथील  अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्याला शेतात अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या  दिरंगाईच्या धोरणाला कंटाळून मच्छिंद्र गार्डी यांनी मानसिक ताण घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

यापूर्वीही खेड तालुक्यात अशी दुर्घटना झालेली आहे संबधित शेतकऱ्याचे अतिक्रमण हटवले नसल्याने औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना प्रशासन चालढकल करत आहे.

या घटनेची माहिती तालुक्यात पसरताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे..प्रशासनाच्या कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार व प्रशासनाचा चालढकलपणा यामुळे मच्छिंद्र गार्डी हे शेतकरी टोकाचे पाऊल घेत आहेत

Previous articleनगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत रक्तदान शिबीर
Next articleमहाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी धनंजय मदने