शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वृक्षारोपण

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन यांचे हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त ८० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. के. आडसूळ, अविनाश बोरकर, महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.विजय कानकाटे, प्रा. एन. बी. कांचन, पी. टी. राजपूत, बापू जगताप तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेकेतर सेवक व विद्यार्थी यांचे वृक्षारोपनसाठी सहकार्य लाभले.

Previous articleघोडेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याची मागणी
Next articleभोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन