भोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन

अमोल भोसले पुणे

भोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे उपाध्यक्ष तथा आंबवडे गावचे सुपुत्र आंबवडे गावच्या सरपंच पदापासून ते तालुक्यातील सर्वच प्रमुख पदांवर आरूढ होत आमदारपदी विराजमान झालेले एकमेव व्यक्तिमत्त्व संपतराव जेधे यांचे आज दि.१५ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ५.४५ च्या दरम्यान अल्पशा आजाराने तथा वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

माजी आमदार संपतराव जेधे यांच्या अकस्मात निधनाने “भोरचे लोकनायक काळाच्या पडद्याआड” गेल्याची भावना पुणे जिल्ह्यातील ,सर्वच क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी ,अधिकाऱ्यांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वृक्षारोपण
Next articleशरद पवार वाढदिवसानिमित्त द्वारका वृध्दाश्रमात खाऊ व साहित्य वाटप