घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याची मागणी

सिताराम काळे घोडेगाव

घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन घोडेगाव नगर पंचायत स्थापन करावी, यासाठी घोडेगाव मधील शिष्टमंडळाने दि. १४ रोजी मुंबई मंत्रालय येथे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घोडेगाव ग्रामपंचायतीचे घोडेगाव नगर पंचायतीत रूपांतर करावे अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे केली.

घोडेगाव ग्रामपंचायत ही आंबेगाव तालुका मुख्यालयामध्ये असणारी ग्रामपंचायत आहे. १ मार्च २०१४ रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये करण्याची उद्दघोषणा नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली होती परंतु अजुनही ग्रामपंचायत घोडेगावचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झालेले नाही. घोडेगाव ग्रामपंचायत ही तालुका पातळीवरील ग्रामंपचायत असुन ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे विस हजार पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना आवश्यक त्या मुलभूत सुविधा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. तसेच नागरी वसाहतीत वाढ झाल्यामुळे घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होत आहे.

घोडेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतमध्ये व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांची देखिल आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी मासिक सभा व ग्रामसभा ठराव देखिल मंजुर केले आहे. त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायत मध्ये रूपांतर व्हावे, अशी मागणी घोडेगाव मधील शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

या शिष्टमंडळामध्ये माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, भिमाशंकर कारखाना संचालक अक्षय काळे, समता परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश घोडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर घोडेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घोडेगाव शहर अध्यक्ष किरण घोडेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख गोविंद काळे, मिलींद काळे, शिवाजी घोडेकर, सुनिल इंदोरे, स्वप्नील घोडेकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बो-हाडे, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Previous articleमंदिरासमोर एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा  करणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वृक्षारोपण