वरच्या भांबुरवाडीच्या पोलीस पाटलावर भर दिवसा गोळीबार

Ad 1

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथील पोलिस पाटीलावर भरदिवसा फायरिंगची घटना घडलीय.वरची भांबुरवाडीचे पोलीस पाटील सचिन वाळुज यांच्यावर गोळीबार झाला. रविवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. एक फायरिंग झाल्यावर गावट्टी कट्टा लॉक झाल्याने त्यांचा जीव वाचला. एक गोळी त्याच्या हाताच्या मनगटाला लागल्याने वाळुंज जखमी झाले आहेत.भर दिवसा हा प्रकार घडल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

सचिन वाळुंज यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ अनिल ढोरे, विपुल भीमाशंकर ठिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही फरार आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ठेकेदार संजय काटकर यांनी पाण्याची टाकी बांधायची जागा पाहण्यासाठी सचिन वाळुंज यांना बोलवले. कौटकर यांच्यासोबत आलेले मित्र व बाळुंज यांची चर्चा सुरू होती. सौरभ अनिल ढोरे, विपुल भीमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे हे सर्व (रा. वरची भांबुरवाडी, ता. खेड) त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेले त्यांच्या उजवा हाताच्या मनगटाला गोळी लागली असुन हाड फ्रॅक्चर झाले आहे. या कट्ट्याने सचिन वाळंज यांच्यावर गोळी झाडली. ती त्यांच्या मनगटाला लागली. दरम्यान, दुसरी गोळी चालवतांना कट्टा घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील पोलिस पाटील व मित्रपरिवाराने रुणालयाच्या आवारात गर्दी केली होती. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.