चाकण परिसरात कोरोनाचा पहिला बळी

चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) येथील कोरोना संसर्ग झालेल्या आडत्याचा रविवारी (दि. २८) सायंकाळी मृत्यू झाला आहे. चाकण परिसरातील हा कोरोनाचा पहिलाच बळी असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या अडत्याच्या मृत्यूमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित अडत्यांचा चाकण मार्केट यार्ड मध्ये गाळा असून नुकत्याच भोसे येथे झालेल्या साखरपुड्याला ते उपस्थित राहिले होते. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या या आडत्यावर चाकण येथील एका रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर संबंधित रुग्णास पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (दि. २८ ) सायंकाळी मृत्यू झाला आहे.

Previous articleवरच्या भांबुरवाडीच्या पोलीस पाटलावर भर दिवसा गोळीबार
Next articleभाजपच्या वतीने गरजू भजनी मंडळांना व रिक्षा चालकांना शिधा वाटप