दत्ता कंद यांचा समाज गौरव २०२० पुरस्काराने गौरव

राजगुरुनगर- जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त सामाजिक विकास क्षेत्रात समाजसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनकल्याण प्रतिष्ठाण चे संस्थापक,केंद्रीय मानवाधिकार सगंठन नई दिल्ली राष्ट्रीय संघटक/सहसचिव दत्ताभाऊ कंद पाटील यांचा समाजगौरव 2020 हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केद्रिंय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदजी दहिवले यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .

यावेळी हरिओम सचितनंद लहरी महाराज वरिष्ठ निरक्षक एस एस कुमरे साहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँन्सर हाँस्पिटल नागपूर चे डाँ रामकृष्ण छंगाणी राष्ट्रीय उपाध्यक्ष डाँ कुमेश्वर भगत मानवाधिकार मिडिया फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश सहसचिव अँड प्रितम शिंदे जनकल्याण प्रतिष्ठाण सचिव बाळासाहेब शिंदे सर मानवाधिकार मिडीया फाऊंडेशन खेड तालुका अध्यक्ष संदेश जाधव उपस्थित होते.

दत्ताभाऊ चे समाजकार्य बाबत जनकल्याण प्रतिष्ठाण च्या माध्यमातून कडूस पंचक्रोशीत जनतेसाठी दरवर्षी विविध आरोग्य शिबीर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप अनाथ आश्रमातील अंध अपंग मुलांसाठी कपडे वाटप कंदवाडी गारगोटवाडी गावच्या विकास कामात नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत विविध विकास कामांचा पाठपुरावा करून कामे पुर्ण केलेली आहे तसेच खेड तालुक्यातील अनेक तरूणांना रोजगार मिळऊन दिला खेड तालुक्यात मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून गोर गरिब जनतेला आपला हक्क न्याय मिळुऊन देण्यासाठी नेहमीच लढत आहे.

Previous articleराजगुरूनगर मध्ये छावा मराठा युवा महासंघाची बैठक संपन्न
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जी बी चौधरी फौंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न