राजगुरूनगर मध्ये छावा मराठा युवा महासंघाची बैठक संपन्न

Ad 1

राजगुरुनगर-छावा मराठा युवा महासंघाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई राक्षे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र देवकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पवार, यांच्या उपस्थितीत आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजगुरूनगर येथे संपन्न झाली.

या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यात मराठा आरक्षणास माननीय सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे ती स्थगिती केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मराठा समाजाला न्याय द्यायला हवा, दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत . म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे व कामगार विरोधी कायदे रद्द करायला हवेत,अन्यथा यापुढील काळात या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर न्याय मिळवण्यासाठी छावा संघटना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करेल अशी भूमिका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी मांडली.बैठकीत संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षपदी खेड पंचायत समितीचे सदस्य श्री संतोष भाऊ सांडभोर यांची तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री कालिदास सातकर उपाध्यक्षपदी अॅड. इंद्रजीत कड तसेच विशाल जरे खेड, विजय कोरडे आंबेगाव, नितीन ढोकळे शिरूर, सहदेव पाडेकर जुन्नर अनुक्रमे तालुकाध्यक्षपदी तर आंबेगाव तालुका उपाध्यक्षपदी महेश वाबळे, पुणे जिल्हा मीडिया प्रमुख सागर मुंगसे यांची निवड करण्यात आली. बैठकीत महिला आघाडीच्या खेड, जुन्नर,चाकण शहर अनुक्रमे स्वातीताई राक्षे, रंजनाताई पावडे, सुवर्णाताई मुळे,सुवर्णाताई कानडे, जयाताई नाईकरे यांनी तालुका अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष श्री धनाजी येळकर पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र देवकर, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई राक्षे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ पानसरे, महादेव गावडे यांच्या हस्ते देत सर्वांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रूपालीताई राक्षे यांनी सर्वांचे आभार मानले.