मंचर येथे मोबाईल शॉपीत चोरी

प्रमोद दांगट ,निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील मार्केटयार्ड मध्ये असलेल्या रुपेश मोबाईल शॉपी येथून १० हजार रुपये किमतीचे मोबाईल व रोख रक्कम ३० हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे .भावेश सुरेश पुंगालिया यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी भावेश पुंगालिया यांचे मंचर येथे मार्केटयार्ड मध्ये रुपेश मोबाईल शॉपी नावाचे दुकान असून ते शुक्रवार दिनांक ११ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता आपली मोबाईल शॉपी उघडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या बँगेत ५ हजार रुपये किंमतीचा एक ओप्पो व ५ हजार रुपये किंमतीचा एक रियल मी कंपनीचे मोबाईल व ३० हजार रुपये रोख रक्कम होती. त्यांनी मोबाईल शॉपी उघडून ती बॅग काऊंटरच्या आतील खुर्चीवर ठेवून ते बाथरूम ला गेले होते.त्यावेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पुंगालिया यांनी खुर्चीवर ठेवलेली बॅग उचलून नेली पुंगालिया हे बाथरूम वरून आल्यास त्यांना बँग दिसली नाही त्यांनी दुकानात व आजूबाजूला शोध घेतला असता बॅग सापडली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुकानातून बॅगेची व त्यातील 40 हजार रुपये रोख रक्कम व मोबाइलची चोरी केली असल्याची फिर्याद त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शिक्षकांनी केले रक्तदान
Next articleराजगुरूनगर मध्ये छावा मराठा युवा महासंघाची बैठक संपन्न