शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जी बी चौधरी फौंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

अमोल भोसले उरुळी कांचन

राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सध्या महाराष्ट्रभर कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणावर असल्याने तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या रक्तदान करण्याचा आवाहनाला प्रतिसाद देऊन हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुलाब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जी बी चौधरी डेव्हलपर्सचे संचालक निलेश चौधरी यांनी सर्व गावकरी महिला व परिसरातील मित्रपरिवार यांना एकत्र करून पेठगाव (ता.हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

यावेळी पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदान चळवळीत सहभाग घेतला इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल ब्लड बँकेचे डॉक्टर ,कर्मचारी परिश्रम घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाच्या वेळी तंटामुक्त समितीचे जिल्हा प्रचार प्रमुख रघुनाथ चौधरी, आदर्श सरपंच महादेव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर ,दूध सोसायटीचे चेअरमन सोमनाथ चौधरी, अर्जुन कांचन , रघुनाथ किसन चौधरी, पांडुरंग चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी,नायगाव सोसायटीचे चेअरमन केशव चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, उद्योजक योगेश चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते सुजित चौधरी, माजी उपसरपंच युवराज चौधरी, अर्जुन कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत चौधरी, विजय चौधरी, काळूराम चौधरी यांच्यासह पेठ गावातील नागरिक, तरुण, महिला उपस्थित होत्या.

Previous articleदत्ता कंद यांचा समाज गौरव २०२० पुरस्काराने गौरव
Next articleशिक्षकांनी शिक्षक कायदे संदर्भातील पुस्तक एस.एस.कोड यांचे वाचन करणे आवश्यक — मा.आमदार दत्ता सावंत