उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असलेला घोळ दुरुस्त झाला नाही तर उपोषणाचा इशारा

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादीत असणाऱ्या चुकांवर योग्य ती दुरुस्ती झाली पाहिजे नाहीतर बेमुदत उपोषणास बसण्याबाबत इशारा संतोष सिताराम बगाडे, सुनील आबुराव तांबे, संजय बबन कांचन , शरीफ शहमहंद शेख, सनी रामचंद्र घुले, रामभाऊ निवृत्ती तुपे, सुनील तुपे, अजिंक्य तुपे, अजय तुपे, संजय शांताराम कांचन खुशाल कुंजीर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

आम्ही वरील पत्यावर कायम स्वरुपी राहण्यास असून उरुळी कांचन गावच्या मतदार यादीत मतदार आहे. निवडणूक आयोग शासन अधीकारी यांच्या वतीने दिनांक २८/१/२०२० रोजी उरुळी कांचन गावाची ग्रामपंचयत निवडणूक बाबत प्रभाग रचना व आरक्षण सोडत केली गेली. आम्ही दिनांक ८/२/२०२० रोजी शिरुर हवेली मा. तहसीलदार यांच्या कडे उरुळी कांचन नव्याने झालेल्या प्रभाग रचणे बाबत खलील बाबीचा विनंती अर्ज केला होता.
उरुळी कांचन गावचा संपूर्ण सहा प्रभागाचा नव्याने सर्व्हे करुन प्रभागतील रहाणाऱ्या मतदारांची नावे त्याच प्रभागतील मतदार यादीत ठेवणे.

उरुळी कांचन गावातील मतदार संख्या वाढल्याने मुंबई ग्रामपंचयत अधिनियम १९५८ च्या प्रभाग रचना नियम प्रमाणे उरुळी कांचन गावातील प्रभाग रचना नव्याने करण्यात आली होती. त्या नुसार पूर्वीचा प्रभाग क्रमांक तीनचे विभाजन करुन काही भाग हा प्रभाग क्रमांक दोनला तर काही भाग प्रभाग क्रमांक चारला व उर्वरित भाग हा प्रभाग क्रमांक तीन म्हणून घोषित केला. त्यामुळे संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनचे विभाजन झाले. मतदारांची नावे ही ती ज्या ठिकाणी राहण्यास आहे त्या प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक असताना तसे न होता राहण्याचं ठिकाण आणि मतदार यादीत प्रभाग रचनेतील नाव यात प्रभाग दोन , प्रभाग तीन , प्रभाग चार, मधील ५० %मतदार चा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोग ,उरुळी कांचन ग्रामपंचयत तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी यांच्या वतीने नव्याने सर्व्हे करुन मतदार यादी तयार करणे आवश्यक असताना देखील तसे न करता विधानसभेची मतदार यादी केवळ कागदोपत्री तयार करुन जाहीर केली गेली ही अतिशय बेकायदशीर बाब आहे.
मृत व्यक्तीची नावे मतदार यादीतून न कमी करता तशीच आढळून येत आहे. बऱ्याच मतदारांची नावे ही गावातील अनेक प्रभाग मध्ये दोन दोन ठिकाणी आढळून येत आहे. उरुळी कांचन गावच्या लगत असणाऱ्या आसपासच्या गावातील व्यक्तीची नावे उरुळी कांचन गावातील मतदार यादीत आढळून येत आहे. त्या व्यक्ती उरुळी कांचन गावातील रहिवाशी नाही त्या व्यक्तीची गावात कुठलीही स्थावर मालमत्ता नाही किंवा भाडेकरू नाही परंतु निवडणूक डोळ्या समोर ठेऊन चुकीच्या पद्धतीने त्याची नावे मतदार यादीत लावली गेली आहेत. अल्पवयीन मुलाची नावे आधार कार्ड व शाळेच्या दाखल्यावर खाडाखोड करून लावलेली आहे ती नावे मतदार यादीतून कमी करण्यात यावी. वरील सर्व बाबीचे पुरावे या अर्ज बरोबर जोडलेल असून योग्य तो शासन निर्णय व्हावा
व उरुळी कांचन ग्रामपंचयत निवडणूक मध्ये पारदर्शकता व शासकीय नियमाला अधीन राहून योग्य तो आदेश व्हावा सर्व गावची नव्याने मतदार सर्व्ह व्हावा अशा स्वरुपाचे जिल्हाधिकारी यांच्या निवेदनात केला आहे. सदर प्रकरणी योग्य ती दखल न घेतली गेल्यास आम्ही दिनांक ११/१२ /२०२० रोजी
सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा आधिकारी कार्यालय या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसणार आहे.
सदरचे निवेदन माहितीसाठी मुख्यमंत्री, जिल्हा अधीकारी पुणे जिल्हा, पोलीस अधीक्षक साहेब
पुणे ग्रामीण, तहसीलदार (ता. शिरुर), राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य, उरुळी कांचन सर्कल तलाठी, लोणी काळभोर
वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी देण्यात आले आहे तरी येथील नागरिकांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात यावी.

Previous articleघोडेगाव बाजारपेठेतील दुकानात तीन लाखांची चोरी
Next articleगारगोटवाडीच्या उपसरपंचपदी रोहिणीताई काळोखे यांची बिनविरोध निवड