घोडेगाव बाजारपेठेतील दुकानात तीन लाखांची चोरी

सिताराम काळे, घोडेगाव- येथील किराणा दुकानाचे लोखंडी कपाटातुन व गल्ल्यातुन चोराटयांनी ३ लाख १०० रूपयांची रोख रक्कम चोरी केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली.

घोडेगाव बाजारपेठेतील जैन मंदीराजवळ राहणारे निलेश विजयकुमार शहा (वय ४५) यांचा किराणा मालाचा व्यवसाय असुन दि. ९ रोजी सकाळी ८ वा. सुमारास त्यांनी किराणा दुकान उघडले व दुकानातील काउंटरची साफसफाई करत असताना त्यांना काउंटरचा गल्ला उघडा असल्याचे निदर्शनात आले आणि त्यातील दहा रूपयांच्या दहा नोटा व गोदरेजच्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटलेला दिसला. कपाट उघडून पाहिले असता लॉकरमध्ये काळया बॅगेमध्ये ठेवलेले ३ लाख रूपये नसल्याचे दिसुन आले.

किराणा दुकानात इतरत्र पाहिले असता दुकानाची लाकडी खिडकी कोणीतरी अज्ञात चोरटयाने दि. ९ (बुधवार) रोजी रात्री १ ते २ चे दरम्यान कशाचे तरी सहाय्याने उघडून त्याव्दारे आत प्रवेश करून दुकानाचे गल्ल्यातील व गोदरेजचे लोखंडी कपाटात ठेवलेले ३ लाख १०० रूपयांची रोख रक्कम कपाटाचा हॅंडल लॉक तोडून चोरून नेले. याबाबतची तक्रार निलेश शहा यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, सहाय्यक फौजदार युुवराज भोजण, शंंकर तळपे, दिपक काशिद, संदीप लांडे, दत्तात्रय जढर करत आहे.

Previous articleतहसील कार्यालयात विजेचा लपंडाव,कामे रखडल्याने नागरिकांमध्ये संताप
Next articleउरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असलेला घोळ दुरुस्त झाला नाही तर उपोषणाचा इशारा