बोरीऐंदी येथे कारमधून गांजा वाहतूक करणारे ४ आरोपी अटक १० लाख २१ हजार रुपयाचा माल जप्त एलसीबी पुणे ग्रामीण शाखेची कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन-

यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीऐंदी भरतगाव रोडने पेट्रोलींग करीत असताना एक पांढरे रंगाची व काळे रंगाच्या काचा असलेली मारुती अल्टो कार नंबर एमएच १२ एचएल ४०२१ ही संशयास्पद दिसून आल्याने कारचा पाठलाग करुन कारला गाडी आडवी लावली असता त्यातील ३ पुरुष व १ बाई यांचेपैकी दोघेजण पळून जाताना त्यांचेसह चौघेजण
प्रकाश राजेंद्र जाधव वय वर्षे २० रा.खराबवाडी (ता.खेड), तानाजी दिगंबर जाधव वय वर्षे २१ रा.इठा (ता.भुम) सध्या रा.रुपीनगर, पाण्याचे टाकीजवळ, निगडी पुणे, सुरेश उर्फ अर्जुन दिगंबर पवार वय वर्षे ५२ रा.बोरीऐंदी (ता.दौंड), द्रौपदा सुरेश उर्फ अर्जुन पवार वय वर्षे ४७ रा.बोरीऐंदी (ता.दौंड) यांना ताब्यात घेवून अल्टो कारची झडती घेतली असता कारच्या मागील डिकीमध्ये अवैधरित्या विक्री करणेसाठी बाळगलेला २ पोत्यामधील ४१ किलो गांजा, ३ मोबाईल असा कारसह किं.रु. १०,२१,०००/- (दहा लाख एकवीस हजार) चा माल मिळून आलेला आहे. सदर मुद्देमाल जप्त करून यवत पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(ब), २०(ब) २(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे
स.फौ. दत्तात्रय जगताप, पो.ह.वा महेश गायकवाड,
पो.ह.वा. निलेश कदम, पो.ह.वा.सचिन गायकवाड, पो.ना.गुरु गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत, स.फौ. राम जगताप, पो.ह.वा. काशिनाथ राजापुरे, पो.कॉ. निलेश चव्हाण, म.पो.कॉ.सोनल धुमाळ यांनी केलेली आहे.

Previous articleलैंगिक अत्याचार गुन्ह्यातील अडीच वर्षे फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक
Next articleरेटवडी येथील स्मशानभूमी व रिटनिंग वॉलचे भूमिपूजन